» About Us

माहितीसाठी कॉल करा

८५५२०२६९९९
Banner Banner

श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. उस्मानाबाद

‘विश्वासातून प्रगतीकडे’

‘विश्वासातून प्रगतीकडे’ अशी ओळख निर्माण झालेली संस्था म्हणजेच ‘श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट’ को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. उस्मानाबाद. संस्थेची मंजूरी दिनांक १२ सप्टेंबर २०११ रोजी केद्रीय निबंधक, दिल्ली यांच्याद्वारे मिळाली तर दिनांक २० ऑक्टोबर २०११ रोजी संस्थापक अध्यक्ष श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांनी मुख्य शाखा उस्मानाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून समृद्धीच्या कार्याला सुरुवात केली. सुरक्षित व सर्वोत्तम सेवेमुळे अल्पावधीतच या संस्थेच्या येडशी, बेंबळी, मुरुड, तुळजापूर, तेर, समर्थनगर (कोर्ट), गवळी गल्ली, आरळी या शाखा कार्यान्वित करण्यात आल्या.

अनेक ग्राहकांचा आर्थिक आधारस्तंभ बनलेली ही संस्था ‘डिजिटल बँकिंग’ ग्रामीण भागातील ग्राहकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी ठरलेली आहे. काळानुरूप बदल करत ग्राहकांपर्यंत विविध सेवा देण्यात ही संस्था कायम सक्षम राहिलेली आहे. ३०० उद्योजकांना आपल्या संस्थेने कर्ज देऊन त्यांच्या स्वप्नांना हातभार लावलेला आहे. आज ही संस्था ३०० उद्योजक निर्माण करण्यात यशस्वी तर झालेली आहेच तसेच ही संस्था महिलांच्या बाबतीतही विचाराने अग्रेसर असल्याने १०० महिला उद्योजक निर्माण करण्यास यशस्वी झालेली आहे. महिला सक्षमीकरण हा संस्थेचा दृष्टीकोन असल्याने महिला बचत गटाच्या माध्यमातून आणखी ५०० महिला व साहित्य निर्माण करण्याचे संस्थेचे ध्येय आहे. 

संस्थेच्या सुरुवातीपासूनच संस्थापक अध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे ‘श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट’ ही जिल्ह्यातील एक अग्रणी व विश्वासार्ह संस्था बनलेली आहे.

शाखा
दिवस अखंड सेवा
सभासद
संस्थापकांचे मनोगत
श्री. दत्तात्रय कुलकर्णी

नमस्कार,

सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार आपली सेवा करण्याची संधी आम्हांला दिली. आपल्या विश्वासाच्या बळामुळे ‘श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट’ संस्था उभी राहू शकली आणि यशस्वी वाटचाल करत आहे. या विश्वासामुळे संस्थेचे २०००० सभासद होऊ शकले. या संस्थेचा प्रत्येक कर्मचारी उत्तम सेवा ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असतो. खातेदारांना सर्व आधुनिक सेवा - सुविधा संस्थेमार्फत मिळाव्या आणि त्यांचा बँकिंगचा अनुभव अधिक सुखकर व समाधानकारक व्हावा यासाठी संस्था कायम प्रयत्नशील असते. आजपर्यंत तुम्ही जी साथ दिली, ही मोलाची साथ अशीच भविष्यातही राहो अशी अपेक्षा करतो.

धन्यवाद.

QR कोड वापरूया, प्रगतीकडे वाटचाल करूया.

अधिक माहितीसाठी आपली विश्वसनीय शाखा ‘श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट’ला भेट द्या किंवा कॉल करा. सर्वोत्तम व सुरक्षित बँकिग सेवेचा लाभ घ्या.